Pune : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज  -ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे वृद्धापकाळाने आणि अल्प आजाराने बुधवारी निधन ( Pune) झाले.  त्यांचे वय 85 वर्षे होते. विख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या त्या पत्नी होत.

Today’s Horoscope 18 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मीना चंदावरकर यांचे शालेय शिक्षण कोकणात आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील वाडिया महाविद्यालयात झाले. 1973 मध्ये अभिनव विद्यालय शाळेच्या इंग्रजी माध्यम विभागाची त्यांनी सुरुवात केली. 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रयोग केले. पुण्यातील अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी तीस वर्षे काम केले. त्यानंतर न्यू इंडिया शाळेच्या संचालिका म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले.

प्रयोगशील शिक्षिका, बालविकासासाठी अध्यापनात नावीन्यपूर्ण कल्पना, पद्धतींचा उपयोग करण्यासाठी त्यांचा नावलौकिक होता.आधुनिक बालमानसशास्त्राच्या आधाराने त्यांनी अनोखे उपक्रम राबवले. अक्षरे, आकडे शिकण्याबरोबर साहित्य, संगीत, चित्रकला अशा विषयांना त्यांनी महत्त्वाचे स्थान ( Pune) दिले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.