एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 18 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख -18.04.2024

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – आश्लेषा 07.57  पर्यंत नंतर मघा.

चंद्र राशी – कर्क 07.57  पर्यंत नंतर सिंह.
—————————–
मेष ( शुभ रंग- पांढरा)

कलाक्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी मिळतील. खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील. सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. व्यक्तिमत्व विकासावर आज भर द्याल.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)

स्थावर प्रॉपर्टी विषयक खरेदी विक्रीची रखडलेली कामे गती घेतील. गृहिणी घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी करतील. मुले आज मन लावून अभ्यास करतील.

मिथुन (शुभ रंग – मोरपंखी)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. पैसा खर्च करण्याचे विविध मार्ग सुचतील. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासात आज पालकांनीही डोकावणे गरजेचे आहे.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

कार्यक्षेत्रातील तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. पैशा अभावी रखडलेले पूर्वीचे उपक्रम सुरू करू शकाल. सहजच घेतलेले निर्णय आज योग्यच ठरतील.

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्ही आनंदी उत्साही असाल. तुमचे कामातील समर्पण इतरांना प्रेरणा देईल. वेळेचे योग्य नियोजन केल्याने आज कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल.

कन्या (शुभ रंग- हिरवा)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल. आज काही महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. इतरांवर अवलंबून राहू नका. स्वावलंबन कामी येईल.

तूळ (शुभ रंग- लाल)

कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी आज अतिउत्तम दिवस आहे. काही अनपेक्षित लाभ तुमचा उत्साह वाढवतील. आज इतरांना दिलेले शब्द पाळता येतील.

वृश्चिक ( शुभ रंग- भगवा)

नोकरदारांना अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. घरात आज वडीलधारी मंडळीही आपलेच खरे करतील. आज सरकारी नियम मोडणे अंगाशी येऊ शकते शिस्त पाळा.

धनु (शुभ रंग- गुलाबी)

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विरोधी दिवस आहे. नवीन उपक्रमाची सुरुवात उद्याच करा. वरिष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यातच उत्तरे द्या . आज देव नवसाला पावेल.

मकर (शुभ रंग- आकाशी)

व्यावसायिक निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आज घरगुती निर्णय घेताना जोडीदाराचे मत नक्की घ्या. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

कुंभ ( शुभ रंग- निळा)

कार्यक्षेत्रात आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.

मीन (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ आज गोड बोलून राबवून घेतील. दुकानदारांची उधारी वसूल होऊ शकते. तब्येत सांभाळा. आज विश्रांती ही गरजेची आहे.

 

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
968916542