Alandi: श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आळंदी मध्ये भव्य शोभायात्रा

एमपीसी न्यूज- आळंदी येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त (Alandi )भव्य श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभा यात्रेचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान यांनी केले होते.

दुपारी 12 वा. महाद्वार चौक येथे प्रभू श्रीराम अभिषेक, श्रीरामरक्षा पठण ,पाळणा व दुपारी साडे बारा वा.श्रींचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला. आळंदी शहरात सायंकाळी चाकण चौकातून श्रीराम चित्ररथाची भव्य शोभयात्रा फटाक्यांच्या आतिषबाजीत,आकर्षक विद्युत रोषणाईत काढण्यात आली.

यावेळी हजारो राम भक्त या शोभा यात्रेत सहभागी(Alandi ) झाले होते.तसेच श्रीरामाच्या गीतावर अनेक जण नृत्य करत होते.

Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहाने केला साजरा

तसेच श्रीराम नवमी निमित्त संत गोरोबा काका मंदिरात श्रीरामाचे लल्लाचे रूप साकारण्यात आले होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.