Pune: शहरात अवकाळी पाऊस, पुणेकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा

एमपीसी न्यूज : आज(दि.17) रोजी सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे  पुण्यातील काही ठिकाणी होर्डिंग पडण्याच्या घटना आणि काही ठिकाणी वाहनांवर झाडे पडल्याची माहिती मिळत आहे.

IMD : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस. भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर

 

गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा पुढे गेल्याची नोंद झाली  असून  पुणेकर कडक उन्हाने हैराण झालेले दिसत आहेत.आज मात्र सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे आणि परिसरातील लोकांना  कडक उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.

 

आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील वाघोली, उबाळेनगर बसथांबा (Pune) परिसरात गाड्यांवर होर्डिंग पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच खराडी,वडगावशेरी,शुक्रवार पेठ या ठिकाणी झाडे पडल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले असून कसबा पेठेत भिंत पडली असल्याची घटना समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.