IMD : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस. भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून साठी पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यावर्षी मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याची शक्यता (IMD) वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी 106 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

 

सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक देखील हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या मान्सून बाबतच्या अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

एक जूनच्या सुमारास केरळच्या दक्षिणेकडील टोकावर मान्सूनला सुरुवात होते. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस मान्सून माघारी फिरतो. सध्या भूमध्यरेखीय प्रशांत महासागरीय क्षेत्रात  एल-निनो मध्यम स्थितीवर सक्रिय आहे. त्यामुळे जलवायू मॉडेलच्या पूर्व अनुमानानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीला एल-निनोची स्थिती तठस्थ होण्याची शक्यता (IMD) आहे.

 

देशात वायव्य, पूर्व, ईशान्य हा भाग वगळता उर्वरित भागांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस होईल. तसेच देशात कोणत्या भागात मान्सूनचे ढग सक्रिय असतील याविषयी सध्या स्पष्टता मिळाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.