Virar : कामगार मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना 10 लाख अर्थसहाय्य द्या – काशिनाथ नखाते

गुढी पाडव्यादिवशी 4 कामगारांचा विरार येथे गुदमरून मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कामगारांचे जीवन असुरक्षित असून दैनंदिन कामावरती होणाऱ्या अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक वाढलेले आहे.यात प्रामुख्याने तळवडे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील सालार कंपनी अशा विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये विविध कामगारांचे  मृत्यू झालेले असताना आता 9 एप्रिल रोजी  विरार येथे  खाजगी सांडपाण्याची टाकी धुण्यासाठी उतरलेल्या 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे.

या सर्व कामगारांच्या मृत्यूप्रकरणी संबधित मालक, ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना ताबडतोब दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावे तसेच राज्याचे मुख्यमंत्री व कामगारमंत्र्यांनी  असंघटित कामगारांकडे लक्ष देऊन त्यांना सुरक्षा योजना चालू करावी अन्यथा लवकरच मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.

शुभम पारकर (वय २८), अमोल घाटाळ (वय २७), निखिल घाटाळ (वय २४), सागर तेंडुलकर (वय २९) अशी मृतकांची नावं आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, विरार (पश्चिम)  येथे  मृत पावलेले वरील सर्व कामगार 25 ते 30 फुट खोली असलेल्या सांडपाणी प्रकल्पाची टाकी धुण्यासाठी उतरले होते. सांडपाण्याची टाकी स्वच्छ करत असताना या सर्व कामगारांचा (Virar) गुदमरून मृत्यू झाला. वास्तविक कामगारांची सुरक्षा करण्याचे काम संबंधित कंपनी  ठेकेदार यांची जबाबदारी असताना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असे दिसून येत आहे. त्यांच्याकडून काम करून घेत असताना अक्षम्य चुका झालेल्या आहेत. त्यामुळे संबधित मालक, ठेकेदार यांच्यावर सदोष  मनुष्ववधाच्या  गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.महाराष्ट्र राज्यातील जनता गुढीपाडवा सण साजरा करत असताना  या 4 कामगारांचा मृत्यू त्याचदिवशी झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे.

सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयाचे अर्थसहाय्य करण्यात यावे. कष्टकरी कामगार अपघाती मृत्यूसाठी  विमा योजना त्वरीत  सुरू करावी. अन्यथा कामगार आयुक्त यांचे  कार्यालयासमोर लवकरच आंदोलनाचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.

Talegaon Dabhade : सांडपाण्याच्या वाहिनीतील पाणी रस्त्यावर आल्याने मारुती मंदिर चौकात दुर्गंधी

विरार येथील कष्टकरी संघर्ष महासंघाचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी व पोलीस स्टेशनला भेट देऊन  या घटनेची माहिती घेतली व संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत सकारात्मक कार्यवाही  करावे असे  निवेदन  दिले. निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मुंबई कार्याध्यक्ष अनंत कदम,माधुरी जलमुलवार व सलीम डांगे यांच्या स्वाक्षरी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.