Loksabha Election :महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देण्यासाठी मराठवाडा मित्रमंडळाची विशेष बैठक

एमपीसी न्यूज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंडळाचे अध्यक्ष अरूण पवार, नितीन चिलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अराईज इंटरनॅशनल स्कूल, भोसरी येथे 25 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित (Loksabha Election) करण्यात आलेली आहे.

Khopoli : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा मनसेचा निर्धार

या बैठकीमध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामाची माहिती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये जे ऐतिहासिक केलेले काम भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी मा. आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून देणार आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट त्यांच्या पुणे येथील जिजाऊ निवासस्थानी घेऊन त्यांना बैठकीची सविस्तर माहिती मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष अरूण पवार यांनी दिली. तसेच प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा. आमदार शिवाजी पाटील कव्हेकर , मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष अरूण पवार, शंकर तांबे, रणजीतसिंह शिवाजी पाटील कव्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.