Lonavala : लोणावळ्यातील हुडको कॉलनीतील दोन घरे फोडली 

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील हुडको कॉलनी येथे चोरट्यांनी दोन घरे ( Lonavala) फोडली. यामध्ये एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना 26 ते 28 एप्रिल या कालावधीत घडली.

मुनीर इसाक शेख (वय 57, रा. हुडको कॉलनी, सह्याद्री नगर, लोणावळा) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : महापालिका अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख आणि त्यांच्या भावाच्या घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून 30 हजार रुपये किमतीचे दोन जोडी कानातील दागिने, 15 हजार रुपये किमतीचा कानातील वेल, 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट, पाच हजारांची चांदीची अंगठी आणि 15 हजारांची सोन्याची नथ असा एकूण एक लाख 25 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. 28 एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. लोणावळा शहर पोलीस तपास करीत ( Lonavala)  आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.