Latur : राजन लाखे यांच्या ‘ढब्बू ढेरपोट्या’ पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी पुरस्कार

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर तर्फे दरवर्षी विविध साहित्य प्रकारात पुरस्कार दिले जातात.यंदाचा बालसाहित्यातील पुरस्कार राजन लाखे लिखित ‘ढब्बू ढेरपोट्या’ या किशोर काव्यसंग्रहास प्राप्त झाला आहे. 

 

हा पुरस्कार सोहळा लातूर येथे होणार आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजन लाखे यांचे बालसाहित्यातील ‘ढब्बू ढेरपोट्या’ हे पहिलेच(Latur) पुस्तक आहे. या पुस्तकाची साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे.

 

राजन लाखे यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये ‘वास्तवरंग फुलताना’, ‘मी पाहिलेला सूर्य’, ‘सौंदर्याच्या गर्भातून’, ‘मनातले माझ्या’, ‘मन माझे मी मनाचा’, ‘गुंता’ तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेला ‘बकुळगंध’ आदी साहित्यकृतींचा (Latur) समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.