Latur : लातूरमध्ये तयार झाली ‘ग्रीन लातूर वृक्ष टीम’

एमपीसी न्यूज – विविध क्षेत्रात काम करणारे तरुण-तरुणी विद्यार्थी (Latur) हे एकत्रीतपणे सुंदर लातूर हरित लातूर साठी झटत आहेत. यातूनच लातूर येथे ग्रीन लातूर वृक्ष टीम तयार झाली आहे. मागील 1 हजार 700 दिवसांपासून हे काम सुरु आहे. यामध्ये इंजिनिअर, डॉक्टर, पत्रकार, नगरसेवक, सीए, पोलीस अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, उद्योजक, समाजसेवक, प्रगतिशील शेतकरी, आय. टी. विद्यार्थी, दुकानदार, व्यवसायिक, टेम्पो चालक, नोकरदार वर्ग, गृहिणी महिला, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वच्छ लातूर, सुंदर लातूर, हरित लातूर या एका विचाराने एकत्रित येऊन कार्य करत आहेत.

या सर्वांनी मागील 1 हजार 700 दिवस दररोज चार तास श्रमदान करत जिल्ह्यात दीड लक्ष झाडे लावली, शहरातील दोन लाख झाडे जगवली, शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात झाडे लावून जगवली. दुष्काळी लातूर ही ओळख पुसून हरित लातूर ही नवी ओळख तयार केली. नियमितपणे शहर स्वच्छ केले, नियमितपणे शहरातील दुभाजक स्वच्छता सुरू आहे.

स्मशान भूमी नियमितपणे स्वच्छ केल्या, कचरा पेटवू नका म्हणून (Latur) सातत्याने पाठपुरावा व प्रबोधन सुरू आहे, थुंकी मुक्त लातूर करिता प्रबोधन सुरू आहे, पोस्टर फ्री लातूर उपक्रम राबविला, खराब भिंती धुवून सुंदर भित्तिचित्रे काढली, धार्मिक कार्यक्रमात प्रसाद स्वरूपात, संक्रांतीला वाण स्वरूपात झाडांच्या बिया किंवा रोपे वाटप करण्याची पद्धत रुजवली शहरात ठिक ठिकाणी शोभिवंत कुंड्या ठेवल्या, हरित घर, एक घर एक झाड, एक नळ एक झाड, बागकाम स्पर्धा, परसबाग स्पर्धा असे विविध उपक्रम घेतले.

शासनाच्या पर्यावरण विषयक विविध उपक्रमात सक्रिय सहभाग दिला. शहरात वीस पंचवीस मोठ्या झाडाचे पूनरोपन यशस्वीपणे केले. नदी तलाव प्रदूषित होऊ नये या करीता कृत्रिम तलावांची निर्मिती करून गणेश मुर्ती संकलित केल्या. ज्या ठिकाणी झाडे लावणे शक्य नाही अशा डोंगर दरयात दहा हजार सीड बॉल बनवून ते रोपण केले.

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सातत्यपूर्ण कार्याने प्रेरित होऊन शहरात हजारो वृक्ष प्रेमी तयार झाले, विविध संस्था, प्रतिष्ठित आक्रमकपणे वृक्ष लागवड व वृक्ष जोपासना करत आहेत. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यामार्फत शहर स्वच्छ, सुंदर, हरित करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व केले जात आहे.

Rahatani : मंदिरात दर्शन घेण्यावरून एकास मारहाण; 14 जणांवर गुन्हा दाखल

हे सर्व कार्य शहरातील सुजाण नागरिकांच्या द्वारे सुरू आहे.मागील साडे चार वर्षांत सरकारी हिशोबाप्रमाणे प्रशासनाचे पन्नास साठ कोटी रुपये वाचवले आहेत. कुठेही कुणालाही त्रास न देता, प्रशासनाला मदत करत हे कार्य मागील 1 हजार 700 दिवसांपासून अखंड, अविरत सुरू आहे. हा नवीन लातूर पॅटर्न तयार झाला आहे, जगभरात या कार्याचे कौतुक होत आहे. लातूर करिता भूषणावह कार्य आहे.

या कार्याची शहर, राज्य, देश पातळीवर याची नोंद घेतली जात आहे, दैनदिन कार्याचे अहवाल स्थानिक प्रशासन, महाराष्ट्र शासन, पीएमओ ऑफिस ला पाठवले जातात. विदेशातील कित्येक संस्था या टीमच्या दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवून आहेत. देश विदेशातील स्थानिक स्तरावर असंख्य पुरस्कारांनी ग्रीन लातूर वृक्ष टीम सन्मानित झालेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.