Pune : खोदकामात तोडलेली वीजवाहिनी दुरुस्त करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शिवाजीनगरमधील आकाशवाणी कॉलनीजवळ सुरु (Pune)असलेल्या मेट्रो रेल्वेच्या खोदकामात तोडलेल्या भूमिगत वीजवाहिनीची दुरुस्ती करीत असताना महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद् चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.22) रात्री सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली.

गणेशखिंड परिसरात मेट्रो रेल्वेसाठी रस्त्याबाजूला खोदकाम (Pune)सुरु आहे. या खोदकामात आकाशवाणी कॉलनीजवळ महावितरणची उच्चदाबाची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे अंतराळ सोसायटी, आकाशवाणी कॉलनी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

गणेशखिंड उपविभाग अंतर्गत मोदीबाग शाखा कार्यालयाचे जनमित्र प्रमोद वाकडे व सागर राईला तोडलेल्या वीजवाहिनीची दुरुस्ती करीत होते. याच दरम्यान रात्री सव्वा सातच्या सुमारास वीजपुरवठा खंडित असल्याच्या रागातून राजेश ओमप्रकाश तुसाम या व्यक्तीने या दोघांनाही शिवीगाळ करीत बांबूने हातावर व डोक्यावर मारहाण केली. जखमी कर्मचाऱ्यांवर औंध रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले.

Rahatani : मंदिरात दर्शन घेण्यावरून एकास मारहाण; 14 जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात आरोपी राजेश ओमप्रकाश तुसाम विरुद्ध भादंवि 353, 332, 504,506 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.