Wakad : गुंतवणुकीच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- गुंतवणुकीच्या पाहण्याने एका सॉफ्टवेअर (Wakad)अभियंत्याची 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 नोव्हेंबर ते 23 जानेवारी या कालावधीत वाकड येथे ऑनलाइन माध्यमातून घडला.

मयूर उमेश चुटे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्पण चॅटर्जी, एक महिला आणि विविध बँक खातेधारक तसेच मोबाईल क्रमांक धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Latur : लातूरमध्ये तयार झाली ‘ग्रीन लातूर वृक्ष टीम’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना फेसबुकवर (Wakad)एआरके इन्वेस्ट नावाचा ग्रुप दिसला. त्यामध्ये त्यांनी क्लिक केले असता आरोपी महिलेने फिर्यादीस एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड केले. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांच्या वडिलांनी आरोपी महिलेचा व्हाट्सअप मोबाईल क्रमांक दिला. त्यावर फिर्यादी यांनी संपर्क केला असता आरोपी महिलेने फिर्यादीस शेअर मार्केट बद्दल माहिती दिली.

15 नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांना फंड डिपॉझिट आणि विड्रॉल करण्याकरिता त्यांच्या कस्टमर सर्विस चा नंबर दिला. फिर्यादी यांना विविध कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्याचे आमिष दाखवून त्यासाठी विविध बँक खात्यांवर पैसे घेतले.

त्यानंतर पैसे विड्रॉल करत असताना फिर्यादी यांच्याकडून चुका झाल्याचे सांगून दंडाच्या नावाखाली पैसे भरण्यास लावत फिर्यादी यांची एकूण 28 लाख 35 हजार 663 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.