SSC HSC Repeater Result : दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीसी न्यूज : जुलै-ऑगस्ट महिन्यात (SSC HSC Repeater Result) घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. 28) जाहीर झाला. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल 29.86 टक्के लागला आहे. तर बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल 32.13 टक्के लागला आहे.

दहावीच्या पुरवणी परीक्षेला राज्यातून 49 हजार 377 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 45 हजार 166 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. 13 हजार 487 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 31 हजार 679 विद्यार्थी पुन्हा नापास झाले आहेत. दहावीचा निकाल 29.86 टक्के लागला आहे. यामध्ये लातूर विभागाचा सर्वाधिक (51.47 टक्के) तर मुंबई विभागाचा सर्वात कमी (15.75 टक्के) निकाल लागला आहे.

Khed : तांदळाच्या पिंडीचे दोंदे गाव

पुणे विभागातून सात हजार 762 विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातील सात हजार 301 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील एक हजार 623 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 22.22 टक्के एवढी आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेला राज्यातून 70 हजार 205 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 68 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. 22 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 46 हजार 765 विद्यार्थी पुन्हा नापास झाले आहेत. बारावीचा निकाल 32.13 टक्के लागला आहे. यामध्ये लातूर विभागाचा सर्वाधिक (58.55 टक्के) तर मुंबई विभागाचा सर्वात कमी (24.82 टक्के) निकाल लागला आहे.

पुणे विभागातून 11 हजार 681 विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातील 11 हजार 452 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील 3 हजार 363 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 29.36 टक्के एवढी आहे.

पुरवणी परीक्षेतही मुलींनी मारली बाजी – SSC HSC Repeater Result

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी 15 हजार 897 मुलींनी नोंदणी केली. त्यातील 13 हजार 688 मुलींनी परीक्षा दिली. चार हजार 885 मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 35. 68 टक्के आहे. तर 33 हजार 480 मुलांनी नोंदणी केली. 31 हजार 478 मुलांनी परीक्षा दिली. त्यातील आठ हजार 602 मुले उत्तीर्ण झाली आहेत. हे प्रमाण 27.32 टक्के एवढे आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी 25 हजार 999 मुलींनी नोंदणी केली. त्यातील 25 हजार 449 मुलींनी परीक्षा दिली. 9 हजार 294 मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 36. 52 टक्के आहे. तर 44 हजार 206 मुलांनी नोंदणी केली. 43 हजार 460 मुलांनी परीक्षा दिली. त्यातील 12 हजार 850 मुले उत्तीर्ण झाली आहेत. हे प्रमाण 29.56 टक्के एवढे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.