SSC HSC Exam 2024 Date : पुढील वर्षीच्या दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीख जाहीर

एमपीसी न्यूज – सन 2024 या वर्षी होणाऱ्या ( SSC HSC Exam 2024 Date ) दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीची परीक्षा एक मार्च 2024 ते बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली.

Khed : तांदळाच्या पिंडीचे दोंदे गाव 

फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.  या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शाळा, महाविद्यालयांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने सहा महिने अगोदर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक संभाव्य असून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी छापील स्वरुपात दिले जाणारे वेळापत्रक अंतिम असेल असेही शिक्षण मंडळाकडून सांगण्यात ( SSC HSC Exam 2024 Date ) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.