SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपी प्रवासात विशेष सुविधा

एमपीसी न्यूज – दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना (SSC HSC Exam )कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने विशेष सुविधा जाहीर केली आहे. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान बारावी आणि 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांना सुविधा दिली जाणार आहे.

21 फेब्रुवारी रोजी बारावीची परीक्षा सुरु होत आहे. तर 1 मार्च रोजी (SSC HSC Exam )दहावीची परीक्षा सुरु होत आहे. विद्यार्थ्यांना घरातून परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने सुविधा जाहीर केल्या आहेत.

Pune : शिक्षक भरतीच्या दलाला पासून सावध रहा;शिक्षण आयुक्तांच्या आवाहनाचे माजी नगरसेवकांकडून स्वागत

परीक्षा कालावधीत बस पासधारक विद्यार्थ्यांचे बसपास त्यांच्या निवासस्थान आणि परीक्षा केंद्र या दरम्यान वैध मानण्यात येतील. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेगळे प्रवासी तिकीट घ्यावे लागणार नाही.

परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बससेवा उपलब्ध व्हावी याकरीता गर्दीच्या बसथांब्यांवर अधिकारी / पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास अतिरिक्त बसेसचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.