Pune : शिक्षक भरतीच्या दलाला पासून सावध रहा;शिक्षण आयुक्तांच्या आवाहनाचे माजी नगरसेवकांकडून स्वागत

एमपीसी न्यूज – शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (आयएएस) यांनी शिक्षक भरतीच्या (Pune)दलाला पासून सावध रहा आणि कोणी फसवणूक करत असल्यास थेट पोलिसात जा, शासन त्यांना मदत करेल, असे जे आवाहन केले आहे त्याचे आम्ही स्वागत करतो, असे माजी नगरसेवकांनी म्हटले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये तत्कालीन शिक्षक प्रमुख मीनाक्षी राऊत (Pune)यांनी शिक्षक भरतीमध्ये केलेले गैरव्यवहार आम्ही शिक्षण आयुक्त यांचे कार्यालयात 7 फेब्रुवारी 2024 रोजी सादर केले तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे 5 फेब्रुवारी 2024 ला दाखल केले, अशी माहिती माजी नगरसेवक उज्जवल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी दिली. पुणे मनपातर्फे मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या प्राथमिक शाळा चालवल्या जातात.

Pimpri : एक लाख उद्योजक घडवण्याचे ध्येय ठेवून काम करणार – गोविंद कुलकर्णी

इंग्रजी माध्यम सोडून इतर माध्यमांना पहिली ते आठवीपर्यंतच्या कायम शिक्षकांचे वेतनाचे 50% अनुदान राज्य शासनाकडून तर 50 टक्के महानगरपालिक तर्फे दिले जाते.

शिक्षक पदे अपदवीधर शिक्षक पहिली ते पाचवी पदवीधर शिक्षक पाचवी नंतर प्रत्येक शाळेत किती विद्यार्थ्यांसाठी किती शिक्षक पदे आवश्यक आहेत, याचे निकष शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी ठरवले असून त्यासाठी दरवर्षी शाळांकडून ऑनलाईन पद्धतीने सरळ प्रणालीत त्यांच्या शाळेत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांची आधार कार्डासह माहिती व शाळेतील आत्ता कार्यरत असलेल्या शिक्षक संख्याची माहिती शासनाकडून मागितली जाते.

आधार कार्डाची तपासणी केल्यानंतर जी विद्यार्थ्यांची संख्या असते त्या संख्येनुसार प्रत्येक शाळेतील आवश्यक मुख्याध्यापक अपदवीधर पदवीधर शिक्षक पदे मंजूर केली जातात, या पदांना संच मान्यतेनुसार मान्य पदे किंवा शाळांची संच मान्यता असे संबोधतात.

शाळेत मंजूर शिक्षक पदापेक्षा कार्यरत शिक्षकांची संख्या कमी असेल तर तेथील शिक्षक पदे शासनाच्या निकषानुसार रिक्तपदे समजली जातात आणि जास्त असतील तर अतिरिक्त समजले जातात. शासनाने मंजूर केलेल्या संच मान्यतेनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये अपदवीधर शिक्षक पदे 62 अतिरिक्त आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट 23 अधिक 11गावे अशा 34 गावांच्या शाळांची देखभाल त्यांच संचलन त्यांच्या शिक्षकांचे “पगार” आजही पुणे जिल्हा परिषद करत आहे.

विशेष बाब म्हणून 10 शिक्षकांना महानगरपालिकेमध्ये घेतले आहे हेही बेकायदेशीर आहे. आज शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे पवित्र पोर्टल मध्ये मेरिट प्रमाणे शिक्षक भरती होईल. 25 जून 2023च्या पुणे महानगरपालिकेच्या जावक क्रमांक 2652 आज्ञापत्रानुसार 219 शिक्षकांची नेमणूक केली आहे
ब) 8 जुलै 2022 रोजी जावक क्रमांक ३४८९५३ शिक्षकांची नेमणूक केली आहे क) 9 नोव्हेंबर 2022रोजी जावक क्रमांक  7846 च्या पत्राप्रमाणे 41 शिक्षकांची नेमणूक केली आहे, अशा 313 शिक्षकांची बेकायदेशीर भरती इतर जिल्हा परिषदेतून पुणे महानगरपालिकेला गरज नसताना महानगरपालिकेचे शिक्षक अतिरिक्त झाले असताना तत्कालीन शिक्षण प्रमुख मीनाक्षी राऊत यांनी नेमणुका केल्या.

या प्रत्येक नेमणुकीमध्ये सात ते आठ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे आमच्या निदर्शनास आले होते ते आम्ही त्यावेळेस मीनाक्षी राऊत यांच्या कानावर घातले होते, असेही या नगरसेवकांनी सांगितले. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने रजा मुदतीतील शिक्षकांना नेमणूक देताना देखील फसवले, त्यांना त्यांची नेमणूक संच मान्यतेच्या आधीन ठेवली तर इतर शिक्षकांना प्रत्यक्ष नेमणुकीचे पत्र दिले.

Nigdi: पोलिसात तक्रार केल्याने पालिकेच्या कंत्राटदाराला बेदम मारहाण

तत्कालीन शिक्षण प्रमुख मीनाक्षी राऊत यांची “लाच लुचपत खात्याच्या” मार्फत चौकशीला शिक्षण खात्याने परवानगी दिली आहे, असे कळले.
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात बेकायदेशीररित्या नेमणूक केलेल्या313शिक्षक इतर जिल्हा परिषदेतून महानगरपालिकेमध्ये आले आहेत.

त्यांना त्यांच्या मुळ ठिकाणी त्वरित परत पाठवावे व त्याजागी पुणे शहरातील जिल्ह्य़ातील योग्य शिक्षकांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नेमणूक करावी.
पुणे महानगरपालिकेच्या आयुक्ताने मीनाक्षी राऊत यांनी महानगरपालिकेची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा भारतीय दंड विधान कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करावा. या संबंधितली सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. शिक्षण आणि पुणे मनपा आयुक्ताने याची चौकशी करावी, असे पत्र दिल्याचे या नगरसेवकांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.