Pimpri : ‘राज्याला पूर्ण वेळ पर्यावरण मंत्री द्या’

एमपीसी न्यूज – राज्यासह पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराचे (Pimpri )पर्यावरण दिवसेंदिवस बिघडत आहे. आगामी लाेकसभा निवडणुकीची येत्या महिन्याभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी पर्यावरण या विषयावर विशेष अधिवेशऩ घ्यावे.

राज्याला पूर्ण वेळ पर्यावरण मंत्री द्यावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

याबाबत राऊळ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेल (Pimpri)व्दारे निवेदन पाठविले आहे.

Pune: नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला स्पर्धा संपन्न 

त्यात म्हटले आहे की, सध्या जग हे वातावरण बदल आणि जागतिक तापमानवाढीबाबत गंभीर परिणाम भोगत आहे. यापुढील काळातही ही परिस्थिती अजून जास्त बिघडणार आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यावरणासाठी निर्णय त्वरित घेणे आवश्यक आहे. राज्यात अवैध वृक्षतोड, वायु प्रदुषण, नदी प्रदुषण, प्लास्टिकचा अतिवापर हे सगळे गंभीर विषय आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन दिवसांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर घ्यावे.

 

या अधिवेशनात महाराष्ट्रातील सर्व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देखील समावून घ्यावे. महाराष्ट्राला एक पूर्ण वेळ पर्यावरण मंत्री द्यावा, अशी मागणी राऊळ यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.