Pune : यावर्षीचा निळू फुले कृतज्ञता सन्मान सुमीत राघवन यांना जाहीर
एमपीसी न्यूज – निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने ( Pune) प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांना जाहीर झाला आहे. रविवार दिनांक 5मे रोजी मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ख्यातनाम अभिनेते – दिग्दर्शक सचिन खेडेकर यांच्या हस्ते सदर सन्मान सुमीत राघवन यांना प्रदान करण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमस्थळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटवा, अन्यथा…!
प्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार राजेश दामले यांच्या संकल्पनेतून साकारात असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘एका पावसात’ या विशेष कार्यक्रमाने होईल. यामध्ये निळू फुले यांच्या कन्या व अभिनेत्री गार्गी फुले थत्ते आणि सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांचा कवितांचा कार्यक्रम होईल. यानंतर सचिन खेडेकर यांच्या हस्ते सुमीत राघवन यांचा सन्मान करण्यात येईल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राजेश दामले हे सुमीत राघवन यांची मुलाखत ( Pune) घेतील.