Mumbai: ताराचंद मेहता यांची गुरुवारी दि.(9 मे) रोजी मुंबईत श्रद्धांजली सभा

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळ बिरामी (जोधपूर) या संस्थेचे माजी खजिनदार ताराचंद तगराज मेहता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या (गुरुवारी)  प्रार्थना सभा आयोजित केली आहे.

मुंबईतील हरिचंद रुपचंद वाडी तिसरी पांजरापोल येथे गुरुवारी दुपारी दोन ते चार या वेळेत ही  प्रार्थना सभा होणार आहे.  गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील हाडेचा गावचे ताराचंद मेहता यांचे सोमवारी दि.(6 मे) रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळ बिरामी (जोधपूर) या संस्थेचे ताराचंद मेहता सक्रिय सभासद होते. संस्थेचे खजिनदार म्हणूनही त्यांनी काम केले.

Pimpri : ताराचंद मेहता यांचे निधन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.