Hinjawadi : वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणत तरुणाला विटेने मारहाण

एमपीसी न्यूज – आजच्या आधुनिक युगात आप्तेष्टांचे वाढदिवस,घरातील थोर माणसांचे अभीष्टचिंतन सोहळे उस्फूर्तपणे साजरे होतात. पण कधीकधी आपण आपल्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा वाढदिवस आनंदी मनाने साजरा करण्यास जातो तेव्हा कोणीतरी कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपण बऱ्याचदा अनुभवले आहे. असाच एक गालबोट लावण्याचा प्रकार बावधन येथे गुरुवारी (दि.25) घडला. बावधन(Hinjawadi)) येथे आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त केक घेऊन गेलेल्या तरुणाला येथे वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणत त्याच्या डोक्यात वीट घालत जखमी केले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराग आनंद झा (वय 25 रा. बावधन) यांचा मित्र तेजस हर्षवर्धन झा फिर्यादीच्या वाढदिवसानिमित्त केक घेऊन आला होता. यावेळी आरोपी गणेश विठ्ठल माने (वय 30 रा. बावधन) याने शिवीगाळ करत इथे वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणत तेजस याला हाताने मारहाण करत डोक्यात वीट घालून जखमी केले,फिर्यादी त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यावरून पोलिसांनी(Hinjawadi) एकाला अटक केली आहे.

 

गणेश विठ्ठल माने (वय 30 रा. बावधन) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून  त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अनुराग आनंद झा (वय 25 रा. बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.