Hinjawadi : पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – गावी जाण्यावरून किरकोळ (Hinjawadi) वाद झाल्यानंतर पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर पतीने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी विंड मिल व्हीलेज, बावधन येथे उघडकीस आली.

आशा जैन (रा. विंड मिल सोसायटी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आशा यांचे जावई संदीप सुभाषचंद्र जैन (वय 57) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार महेंद्र दयालचंद जैन (वय 79) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune: जागतिक महिला दिनानिमित्त उद्या क्रिडा राज्ञी पुरस्कारांचे वितरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासू-सासरे सन 2018 पासून त्यांच्याकडे राहण्यासाठी आहेत. मंगळवारी सासू आशा आणि सासरे महेंद्र यांचा गावी जाण्यावरून किरकोळ वाद झाला. त्यानंतर ते बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले. बुधवारी सकाळी फिर्यादी यांच्या पत्नी आई-वडिलांना झोपेतून उठवण्यासाठी त्यांच्या बेडरूम मध्ये गेल्या असता महेंद्र जैन यांनी बागेतील कामासाठी (Hinjawadi) आणलेल्या कोयत्याने आशा यांच्यावर वार करून स्वतःच्या शरीरावरती कोयत्याने वार करून घेतले होते. यामध्ये फिर्यादी यांच्या सासू आशा जैन यांचा खून झाला असून सासरे महेंद्र यांनी स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.