Pune: जागतिक महिला दिनानिमित्त उद्या क्रिडा राज्ञी पुरस्कारांचे वितरण

एमपीसी न्यूज – नारी तू नारायणी असे महिला शक्तीचे वर्णन (Pune)आपल्याकडे केलेले आहे. आजच्या जगात या नारायणीचे एक रूप क्रिडापटूचेही आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील महिला खेळाडूंचा क्रिडा राज्ञी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

 

पुण्यातील विविध खेळातील  17 आजीमाजी क्रिडापटूंचा गौरव राज्यसभेच्या(Pune)  नवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी नीता तळवलीकर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सूर्यदत्त इन्सिट्यूट आणि संवाद पुणे यांनी या “गौरव तिच्या उत्तुंग कर्तृत्वाचा” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी महिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली.

 

ते म्हणाले, सूर्यदत्त संस्थेच्या बावधन येथील बन्सीरत्न ऑडिटोरियममध्ये, गुरूवारी, दि.7 या दिवशी होणा-या गौरव समारंभाचे अध्यक्षस्थान अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू, शांताराम जाधव भूषवणार आहेत.

Maval : भाजपची लाभार्थी संपर्क अभियान कार्यशाळा संपन्न   

या समारंभाला सूर्यदत्त इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष प्रा. संजय चोरडिया, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष  सुषमा चोरडिया, सहाय्यक उपाध्यक्ष स्नेहल नवलाखा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

 

याशिवाय क्रिडा राज्ञी जीवन गौरव पुरस्काराच्या माजी विजेत्या हॉकीच्या माजी कर्णधार रेखा भिडे – मुंडफन आणि ऍथलेटिक्सच्या प्रशिक्षक गुरबन्स कौर, हिल रेंज हायस्कूलच्या डॉ. तेजस्वीनी भिलारे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपल्याक्रिडा कौशल्याची चुणूक दाखवलेल्या पुण्यातील महिला खेळाडूंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यातून लहान व तरुण खेळाडूंना स्फूर्ती व प्रेरणा मिळेल असा विश्वास, कार्यक्रमाचे संयोजक महाजन आणि सचिन ईटकर यांनी व्यक्त केला. या समारंभात श्रृती कोतवाल (रनिंग), स्नेहल शिंदे (कबड्डी), अकुताई उलभगत (पॅरा ऍथलेटिक्स), ऐश्वर्या घोडके (स़ॉफ्टबॉल), ऋतूजा भोसले (टेनिस), कोमल गोळे (कुस्ती), राधिका दराडे (सायकलिंग), समिक्षा शेलार (ज्युदो), खुशी मुल्ला (क्रिकेट), भावना सत्यगिरी (आर्चरी), प्रियांका इंगळे (खो खो), मिताली प्रधान (मल्लखांब), वैशाली सुळ (हॉकी), श्रेया कंदारे (योगा), हिमाली कांबळे (वेटलिफ्टिंग), रेणुका साळवे (ज्युदो दिव्यांग), नेहा बढे (रोईंग) यांना राज्ञी क्रिडापटू पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

 

हा समारंभ सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न ऑडिटोरियममध्ये गुरूवार, दि. 7 मार्चला सकाळी 10 : 30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे आणि महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, मुंबईचे सचिन ईटकर हे निमंत्रक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.