Maval : भाजपची लाभार्थी संपर्क अभियान कार्यशाळा संपन्न   

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्यातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकारी (Maval)कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थी संपर्क अभियान कार्यशाळा वडगाव मावळ येथे उत्साहात संपन्न झाली.
मोदी सरकारने राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांचा मावळ तालुक्यातील(Maval) जवळपास 23 हजार कुटुंबांना थेट लाभ झाला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्ष तालुक्यातील सर्व लाभार्थींच्या घरोघरी जाऊन भेटी घेऊन त्यांना मोदी यांच्या कामाचे पत्रक वाटप करणार आहेत.
याप्रसंगी प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर,तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड,जेष्ठ नेते राजाराम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष व लाभार्थी संपर्क अभियान प्रमुख रामदास गाडे, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, संघटन सरचिटणीस संतोष राक्षे, मा. उपसभापती शांताराम कदम, प्रदेश सदस्य जितेंद्र बोत्रे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय माळी यांच्यासह सर्व सन्माननीय सुपर वॉरियर्स, सर्व आघाड्यांचे सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Dehuroad : विशाल थोरी खून प्रकरणी चौघांना अटक; आरोपींच्या अटकेनंतर तरूणावर अंत्यसंस्कार

भारतीय जनता पार्टी मावळ तालुका लाभार्थी संपर्क अभियान कार्यशाळा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. बुधवार (दि 6) स्वागत हॉटेल ब्राम्हणवाडी फाटा वडगाव मावळ येथे भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्यातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थी संपर्क अभियान कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांचा मावळ तालुक्यातील जवळपास 23 हजार कुटुंबांना थेट लाभ झाला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व सुपर वॉरियर्स व बूथ अध्यक्ष तालुक्यातील सर्व लाभार्थींच्या घरोघरी जाऊन भेटी घेऊन त्यांना मोदी यांचे पत्रक वाटप करावी अशा सूचना यावेळी बोलतांना निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी केल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.