Loksabha Election 2024 : मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणीच्या तरतूदीनुसार मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक यांच्यामार्फत(Loksabha Election 2024) करण्यात येणार आहे.

 

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील पाचव्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षात खर्च तपासणी करण्यात येईल. ही तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या  दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 3 मे रोजी तर दुसरी 7 मे रोजी तर तिसरी तपासणी 11 मे  2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.

 

पुणे लोकसभा मतदारसंघात सभागृह क्रमांक 3, चौथा मजला, बी वींग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे खर्च तपासणी करण्यात येणार आहे. पहिली तपासणी 2 मे रोजी, दुसरी तपासणी 6 मे आणि तिसरी तपासणी 10 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे पुणे लोकसभा मतदारसंघाचे  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे(Loksabha Election 2024) यांनी सांगितले.

 

शिरुर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. खर्च तपासणी सभागृह क्रमांक 3, चौथा मजला, बी वींग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे करण्यात येणार आहे. पहिली तपासणी 3 मे रोजी, दुसरी तपासणी 7 मे आणि तिसरी तपासणी 11 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.