Dehuroad : विशाल थोरी खून प्रकरणी चौघांना अटक; आरोपींच्या अटकेनंतर तरूणावर अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरातील विकासनगर (Dehuroad) येथे पूर्व वैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 6) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

रोहन राजेश देशमुख (23), चिक्या उर्फ सुयश विलास देशमुख (वय 26, दोघे रा. देहूरोड), अमित कैलास वरगडे (वय 24), वैभव शिवप्पा ओनी (वय 20, दोघे रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आदित्य, राजेश देशमुख (रा. देहूरोड) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विजय थोरी (वय 24, रा. देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजय रामशरण थोरी (वय 47) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि आराेपी यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले हाेते. त्याचाच राग आराेपीच्या मनात हाेता. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री विशाल आणि आराेपी यांच्यात पुन्हा वाद झाला. आराेपी राेहन देशमुख याच्या आजीने फिर्यादी विजय थाेरी यांच्या पत्नीला फाेन करून तेरे लडकेने राेहन के साथ झगडा किया है, अभी वाे 20-25 लडके बुलाये है, आज उसकाे छाेंडेगे नही, उसकाे बहुत मारेंगे, अशी धमकी दिली.

Pune: स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी – डॉ. नीलम गोऱ्हे

तसेच राजेश देशमुख याने फिर्यादी थाेरी यांना तेरे लडके का बहुत नाटक (Dehuroad) हाे गया है, आज उसकाे छाेडेंगे नही, आज उसकाे शाॅट दिखाऐंगे, बहुत मारेंगे और बच गया ताे उसकाे चाैकी में जमा करेंगे, असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर आराेपींनी विशाल याला लाकडी दांडक्याने, सिंमेट ब्लॉक, कुंडीने जबर मारहाण करून त्याचा खून केला.

दरम्यान, विशाल हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या देहूराेड विभाग प्रमुख विजय थाेरी यांचा मुलगा हाेता. त्याच्या खुनानंतर आराेपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली हाेती. देहूराेड पाेलिसांनी सातपैकी चार आराेपींना अटक केल्यानंतर बुधवारी सायंकाळी विशालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.