Pune Loksabha : काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार – मोहन जोशी

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदारसंघातील पाच ते साडेपाच लाख घरांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख मोहन जोशी(Pune Loksabha) यांनी दिली.

 

पुढे बोलताना मोहन जोशी म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने युवक न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, श्रमिक न्याय, भागीदारी न्याय आदी संकल्पनांतर्गत गॅरंटी कार्ड तयार केले आहे. यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाला पहिली नोकरी मिळेपर्यंत एक लाख रुपये विद्यावेतन, प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये, शेतकर्‍यांना कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमी, भावाची कायदेशीर गॅरंटी, मनरेगात दरदिवशी किमान 400 रुपये मजुरी, सामाजिक व आर्थिक समानतेसाठी जनगणना आदींचा समावेश(Pune Loksabha) आहे.

Pune : रविंद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांची नेमणूक

काँग्रेस पक्षाचे हे गॅरंटी कार्ड शहरातील वीस लाख मतदारांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या व इंडीया फ्रंट व मित्र पक्षांच्या कार्यकर्ते मतदारसंघातील पाच ते साडेपाच लाख घरांमध्ये जाणार आहेत. या कामासाठी सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बुथनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील दोन हजार बुथवर एकाच वेळी गॅरंटी कार्ड पाठवण्याची मोहीम शनिवारपासून (27 एप्रिल) हाती घेण्यात येणार आहे.  या गॅरंटी कार्डच्या खाली असलेल्या स्लिपवर मतदाराचे नाव व इतर माहिती भरून घेवून त्या स्लिप संकलीत केल्या जाणार आहेत. हे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.