Sangvi: व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाची 10 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना नवी सांगवी ते पिंपळ गुरव परिसरात डिसेंबर 2023 या कालावधीत(Sangvi) घडली आहे.

 

याप्रकरणी सरेशलाल मिस्त्रिलाल खिवंसरा (वय 62 रा.सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.26) फिर्याद दिली आहे.यावरून अमोल आबासाहेब कायगुडे (वय 33 रा. सांगवी) याला अटक(Sangvi) केली आहे.

 

Kalewadi : मोबाईल टॉवरचे सुमारे दोन लाखांचे AZNA कार्ड चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने पोलीस असून  गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असल्याचे सांगून तो परिसरात वेगवेगळ्या दुकानात खरेदी करत होता. तसेच पेटीएमवर पैसे देण्यासाठी निकनेमच्या ठिकाणी दुकानाचे नाव टाकून पैसे भरल्याचे भासवत व्यावसायिकाची 10 हजार 320रुपयांची फसवणूक करण्यात आली . यावरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.