Kalewadi : मोबाईल टॉवरचे सुमारे दोन लाखांचे AZNA कार्ड चोरीला

एमपीसी न्यूज –  मोबाईल टॉवरवरील 1 लाख 92 हजार रुपयांचे तीन  AZNA कार्ड चोरीला(Kalewadi) गेले आहेत. ही चोरी 13 मार्च 2024  रोजी काळेवाडी फाटा येथे  उघडकीस आली.

 

याप्रकरणी लुकस अण्णा मगर (वय 37 रा. वडगाव मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.26) फिर्याद दिली आहे.यावरून अज्ञात चोरावर गुन्हा  केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेल कंपनीचे टॉवर क्र.13 येथून 64 हजार रुपये किंमत असलेले तीन AZNA कार्ड(Kalewadi)  असा एकूण 1लाख 92 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात इसमाने चोरून नेला आहे.वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.