BSNL 4G : बीएसएनएल आणणार 4-जी सेवा

एमपीसी न्यूज – सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड(BSNL) येत्या ऑगस्ट महिन्यापासून स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4-जी सेवा सुरु करणार आहे. बीएसएनएलने आपल्या 4-जी नेटवर्कमध्ये 40-45 एमबीपीएस वेगाने इंटरनेट(BSNL 4G )देण्याचा दावा केला आहे.

बीएसएनएल कंपनीने आयटी कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) आणि सी डॉट यांच्या मदतीने पंजाब राज्यात  4-जी सेवा सुरु केली आहे. तिथे सुमारे आठ लाख ग्राहकांना कंपनीने ही सेवा पुरवली आहे. पंजाब मध्ये जुलै 2023 मध्ये सी-डॉटच्या मदतीने 4-जी सेवा सुरु करण्यात आली.

बीएसएनएल 4-जी आणि 5-जी साठी संपूर्ण देशभर एक लाख 12 हजार टॉवर देखील बसवणार आहे. आतापर्यंत कंपनीने 4-जी साठी देशभर नऊ हजारपेक्षा अधिक टॉवर बसवले आहेत. यातील सहा हजारपेक्षा अधिक टॉवर पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणा परिसरात बसवण्यात आले आहेत.

खासगी क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांमुळे बीएसएनएल कंपनी संकटात आली आहे. बीएसएनएल कडून हायस्पीड डेटा पुरवला जात नसल्याने अनेक ग्राहक खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडे वळले आहेत. 4-जी आणि 5-जी सेवा सुरु केल्यास बीएसएनएल कंपनी((BSNL 4G )) पुन्हा स्पर्धेत येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.