TRAI News : सावधान! ट्राय कधीही ग्राहकांना मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनसाठी मेसेज करत नाही

एमपीसी न्यूज – दूरसंचार सेवा प्रदाते जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि ( TRAI News) बीएसएनएल या कंपन्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)सूचना दिल्या आहेत. ट्रायकडून कधीही ग्राहकांना मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी मेसेज, कॉल केला जात नाही. याबाबत दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, असे ट्रायने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे.

अलीकडच्या काळात ट्रायच्या नावाने नागरिकांना व्हेरिफिकेशनच्या नावाखाली बनावट मेसेज, लिंक येत आहेत. त्यातून अनेकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे ट्रायने दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ट्रायचे सचिव व्ही रघुनंदन म्हणाले, सायबर गुन्हेगार टेलिकॉम कंपन्या आणि ट्रायच्या नावाने लोकांना चुकीचे संदेश पाठवत आहेत. त्यातून नागरिकांची फसवणूक केली जात आहेत. आम्ही सर्व वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना सल्ला देण्यासाठी एक इशारा संदेश पाठवत आहोत.

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील स्काऊट – गाईड विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

टेलिकॉम कंपन्यांचे टॉवर बसविण्याचे आमिष दाखवतात. टॉवरसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे देखील आमिष दाखवले जाते. कनेक्शन बंद करण्याची धमकी देत नागरिकांना घाबरवले जाते. तसेच मोबाईल क्रमांक पडताळणीच्या नावाखाली बनावट ( TRAI News) लिंक पाठवून त्यांची फसवणूक केली जाते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क करण्यासाठी एक संदेश पाठवण्याबाबत ट्रायने दूरसंचार सेवा प्रदात्या कंपन्यांना सांगितले आहे.

ट्राय कधीही ग्राहकांना मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करण्यासाठी, नंबर डिस्कनेक्ट करण्यासाठी किंवा बेकायदेशीर क्रियाकालापांसाठी तक्रार करण्यासाठी कोणताही कॉल किंवा संदेश पाठवत नाही. ट्रायच्या नावाने येणाऱ्या कॉल आणि मेसेजपासून सावध रहा, असे त्या संदेशात म्हटले जाणार आहे. अशा मेसेज अथवा कॉलला उत्तर देण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे. संशयित कॉल आणि मेसेज बाबत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन देखील ट्रायकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.