Pimpri : पिंपरीतून बीएसएनएलची केबल चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरीतील (Pimpri) शगुन चौकातून भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची केबल चोरट्याने चोरून नेली आहे हा प्रकार 12 जून ते 24 जून दरम्यान पिंपरी बाजार येथे घडला आहे.

 

Alandi : आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

याप्रकरणी मनीष शहाजी खांदवे (वय 45 राहणार पिंपळे सौदागर ) यांनी बुधवारी(दि.28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएलच्या मालिकेचे 32 हजार रुपयांचे सिटी बॉक्स केबल वायर हे चोरट्याने परस्पर चोरून नेले आहे गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.