Alandi : आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – देवशयनी आषाढी एकादशी निमित्त दि.29 रोजी आज श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी हजारो भाविकांनी माऊलीं मंदिरात गर्दी केली होती.

Pune : पुण्यात सोने-चांदीचे भाव स्थिरावले

 इंद्रायणी घाट भाविकांनी फुलला होता.हार, फुले,वारकरी साहित्य वस्तूंच्या दुकाना मध्ये व प्रदक्षिणा रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसून येत होती. माऊलीं मंदिरात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती. शहरात कमी जास्त स्वरूपात पाऊस हजेरी लावत होती. एकादशी निमित्त राहुल चव्हाण व मित्र मंडळाने मंदिरात खिचडीची वाटप केले. इंद्रायणी नदी जलप्रदूषणा मुळे सलग चौथ्या दिवशी सुद्धा फेसाळलेली दिसून आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.