Amazon : ॲमेझॉनच्या मदतीमुळे लघु व्यावसायिक बनले कोट्याधीश

एमपीसी न्यूज – लघु व्यावसायिक आपली उत्पादने ॲमेझॉनच्या माध्यमातून ( Amazon) जगभर विकत असल्याने अनेक लघु उद्योजक कोट्याधीश बनले आहेत. लघु उद्योजकांच्या उत्पादनांना जगभरातून चांगली मागणी येत असल्याने अनेक उद्योजक ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर आपल्या उत्पादनांची नोंदणी करताना दिसत आहेत.

दागिने, आरोग्य आणि व्यक्तिगत देखभालीची उत्पादने तसेच पैठणी साड्या, कोल्हापुरी चपलांचे उत्पादक असलेल्या लघु व्यावसायिकांना आता जगभरातील ग्राहकांपर्यंत ॲमेझॉनमुळे पोहोचता आले आहे. राज्यातील अशा व्यावसायिकांची संख्या 15000 च्या घरात जाणारी आहे.

Horizon Industrial Park Chakan : होरायझन इंडस्ट्रियल पार्कची चाकणमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक 

जळगाव, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील छोटे उद्योजक चांगले उत्पन्न कमावत आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम (एसएमई) व्यावसायिकांसाठी निर्यात सोपी करण्यासाठी ॲमेझॉनने ग्लोबल सेलिंग उपक्रम राबवला. हा उपक्रम सन 2015 साली सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत सध्या देशभरातून सव्वा लाखापेक्षा अधिक निर्यातदार व्यापार करीत आहेत.

यापैकी 1200 निर्यातदारांनी सन 2022 मध्ये एक कोटी विक्री उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे. कोल्हापूर मधील निर्यातदारांनी सन 2022 मध्ये 43 लाख डॉलर म्हणजे 33 कोटी रुपयांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. आपल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने अनेक लघुव्यवसायिक आता ॲमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मकडे वळू लागले ( Amazon) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.