Pune News : ॲमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये वर्क फ्रॉम होम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज : ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होमसाठी जागा असल्याचे सांगून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची चौतीस हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. उत्तम नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिबी चेतनकुमार बोराडे (वय 28) या तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज करून ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट येथे वर्क फ्रॉम होमसाठी कामाच्या जागा आहेत असा मेसेज केला. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईल वर मेसेज करून आणि नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ॲप वरून फिर्यादीला खरेदी करण्यास भाग पाडून चौतीस हजार 630 रुपयांची फसवणूक केली आहे.

फिर्यादीने सुरुवातीला सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्यास संबंधित तक्रार दिली होती. त्यानंतर हा गुन्हा उत्तम नगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.