Thergaon : निवडणूक मतदान यंत्रे स्ट्राँग रूममध्ये बंदिस्त

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी मतदान यंत्रे (Thergaon)तयार करण्यात आली आहेत. ही यंत्रे कोरेगाव पार्क येथून थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आली आहेत.

त्यामध्ये कंट्रोल युनिट 779, बॅलेट युनिट 779 व व्हीव्हीपॅट 849 असे 2 हजार 407 मतदान यंत्रांचा (Thergaon)समावेश आहे. ही रूम सीलबंद आहे. शिवाय सुरक्षेविषयक सर्व काळजी घेण्यात आली असून, पुरेसा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

मावळ लोकसभेची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे ला होणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघानुसार मतदान यंत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी आवश्यक मतदान यंत्रे कोरेगाव पार्क येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून आणण्यात आली आहेत. हे यंत्र थेरगाव येथे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. स्ट्राँगरूम सील केले आहे.  तसेच सद्यःस्थितीत स्ट्रॉगरूम परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी 24 तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Hinjawadi : गुंतवणुकीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी म्हणाले, पोलिस बंदोबस्तामध्ये मतदान यंत्रे आणली आहेत. ते स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितपणे  ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.