Bhosari : शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – शिरुर  लोकसभा मतदारसंघात आज (दि,25 एप्रिल) रोजी विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही,असा टोला लगावत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.

भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर छगन भुजबळांना शिरुरमधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कोल्हे(Bhosari) यांनी केला. आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले.

 

Bhosari : युवकांनो परिवर्तनाचे शिलेदार व्हा – डॉ. अमोल कोल्हे

त्यावरून डॉ. अमोल कोल्हे यांनी डमी उमेदवार(Bhosari) म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिरुर लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज  भरायला आले नाहीत. महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मी काय सभा घेणार नसून फक्त रोड शो करून जाईल. यावरूनच स्पष्ट होत आहे की शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.