Bhosari : युवकांनो परिवर्तनाचे शिलेदार व्हा – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज –  युवकांनी काठावर बसून फक्त टाळ्या वाजवल्या तर ते परिवर्तनाचे ( Bhosari) साक्षीदार होतील. परंतु समोर येऊन या लढ्यात सामील झाले तर या परिवर्तनाचे शिलेदार होतील. त्यामुळे युवकांनी परिवर्तनाचे शिलेदार व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, युवासेना, युवक काँग्रेस, आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त “युवा महाराष्ट्राभिमान मेळावा” भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यग्रह येथे पार पडला. यावेळी ( Bhosari) मेहबूब शेख,आपचे मयूर दौंडकर,काँग्रेसचे शिवराज मोरे,युवासेनेचे विशाल ससाणे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

Nigdi : तरुणाला विनाकारण लोखंडी रॉडने मारहाण

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की,  “देशातील जनतेचा मोदी सरकारने अपेक्षाभंग केला आहे. विशेष करून युवकांना बेरोजगार करण्याचे पाप या सरकारने केले आहे. जगाचा इतिहास बघितला तर  क्रांती तेव्हा घडते जेव्हा युवक मनावर घेतो. देशातील वातावरण बदललेलं आहे. केंद्रातील मोदी सरकार यावेळेस जाणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. ही निवडणूक युवकांच्या अस्तित्वाची आहे. तरुणांनी प्रवाहात असणे गरजेचे आहे. युवकांनी काठावर बसून फक्त टाळ्या वाजवले तर परिवर्तनाचे साक्षीदार होतील परंतु समोर येऊन या लढ्यात सामील झाले तर या परिवर्तनाचे शिलेदार होतील. 2024 निवडणुकीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा महाराष्ट्रातील युवक संविधान वाचवायच्या लढाईमध्ये आघाडीवर होता असा इतिहास लिहिला जाईल.केंद्रातील जुलमी सत्ता बदलण्यासाठी इथला युवक नक्कीच माझी साथ देईल असेही ते म्हणाले.

मेहबूब शेख म्हणाले की, डॉ. कोल्हे यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्यांमध्ये ( Bhosari) राहणारा,त्यांच्या प्रश्नांची जाण असलेला एका शेतकऱ्याच्या मुलाच्या रूपाने उमेदवार लाभला आहे. महाराष्ट्रातील नागरिक गद्दारीला थारा देत नाहीत. महाराष्ट्रातील नागरिक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे शरद पवार, डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. विक्रमी मताधिक्याने निवडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करतील हा विश्वास आहे. डॉ.अमोल कोल्हे हे आपल्या पहिल्याच टर्म मध्ये संसदरत्न झाले ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे या लोकसभा मतदार संघात तुतारीच वाजणार हा आम्हाला विश्वास आहे.

यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की, गेल्या दहा वर्षात दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन युवकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या मोदी सरकारने केले. युवकांचे मूळ प्रश्नावरील लक्ष विचलित ( Bhosari) करण्यासाठी युवकांना धार्मिक मुद्द्यांवर अडकवले जात असल्याची टीका यावेळी केली.

Delhi : महावीर जयंतीनिमित्त दिल्लीत निर्वाण महोत्सव
स्वप्नील गायकवाड म्हणाले, ज्यावेळेस सगळे आमदार भाजपचे मांडलिकत्व स्वीकारून पक्षाशी गद्दारी करत होते. तेंव्हा डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या शरद पवारांना सोडणार नाही अशी भूमिका घेतली. युवकांनी अशा निष्ठावंत उमेदवाराच्या पाठीशी राहिले पाहिजे.

या मेळाव्यास आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आप पक्षाचे महासचिव वैजनाथ शिरसाट, आपचे संघटन मंत्री वाजीद शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे ग्रामीण अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, पुणे अध्यक्ष किशोर कांबळे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष इम्रान शेख, युवा सेनेचे संपर्क प्रमुख विशाल ससाणे, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, मीना जावळे, दत्तात्रय काळजे, साहिल शेख, अर्शद शेख, राहुल कुल युवराज सोनार, प्रवीण आव्हाळे, विशाल जोगदंड, सुलतान तांबोळी, अमित भालेराव, सारीकाताई हरगुडे, चंद्रकांत लोंढे, संतोष म्हात्रे सागर तापकीर,रजनीकांत गायकवाड, संतोष शिंदे, हाजीमलंग शेख आदी उपस्थित ( Bhosari)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.