Chikhali : गॅस पाईप लिकेज होऊन सिलेंडरचा स्फोट

एमपीसी न्यूज – घरामध्ये गॅस पाईप लिकेज होऊन लागलेल्या आगीत एका (Chikhali)सिलेंडरचा स्फोट झाला. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री नऊ वाजता सिल्वर जिम देवराई सोसायटी शेजारी जाधववाडी चिखली येथे घडली.

 

अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी चिखली येथील(Chikhali) सिल्वर जिम देवराई सोसायटी शेजारी एका घरात आग लागल्याची माहिती माजी महापौर राहूल जाधव यांनी अग्नीशमन विभागाला दिली. त्यानुसार मोशी आणि चिखली उप अग्निशमन केंद्र येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एक गाडी पाणी मारून आग विझवण्यात आली. सुदैवाने या घटनेमध्ये जीवित हानी झाली नाही.

Pune: गेटवर आयकार्ड विचारले म्हणून महापालिका अभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षा रक्षकाला मारहाण

 

घरामध्ये कमर्शियल सिलेंडर वापर करण्यात येत होता. स्वयंपाक बनवत असताना सिलेंडरचा पाईप लिकेज होऊन आग लागली. या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. घरामध्ये तीन कमर्शियल सिलेंडर व एक घरगुती वापराचा सिलेंडर होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.