Pune : नोकरीवरून काढल्याच्या आरोपावरून पुण्याच्या कामगार आयुक्तांनी अॅमेझॉनला पाठवली नोटीस

एमपीसी न्यूज : पुण्यातील कामगार आयुक्त कार्यालयाने (Pune) बेकायदेशीर स्वैच्छिक पृथक्करण धोरण आणि टाळेबंदीच्या अंमलबजावणीबाबत ई-कॉमर्स कंपनी Amazon ला नोटीस पाठवली आहे. कामगार विभागाने अॅमेझॉन व्यवस्थापनाला 17 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

आयटी कर्मचार्‍यांची नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ही संघटना आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 1000 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची रोजीरोटी असुरक्षित बनली आहे. औद्योगिक विवाद कायद्यांतर्गत ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार, सरकारच्या पूर्वपरवानगी शिवाय, आस्थापनाच्या मस्टर रोलमध्ये असलेल्या कर्मचार्‍याला काढून टाकू शकत नाही,” असे NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा म्हणाले.

Pune Gang : दहशत माजवणाऱ्या गॅंगसमोर पुणेकरही कमी नाहीत; नागरिकांनी दिला गुंडांना बेदम मार

ते पुढे म्हणाले, की “ज्या कर्मचाऱ्याने किमान एक वर्ष सतत सेवा केली असेल, त्याला तीन महिने अगोदर नोटीस दिल्याशिवाय आणि योग्य सरकारची पूर्वपरवानगी दिल्याशिवाय कामावरून कमी करता येणार नाही. असा अर्ज नियोक्त्याने योग्य कारणांसह सादर केला पाहिजे. सदर अर्ज विचारात (Pune) घेतला जाईल आणि चौकशीद्वारे त्याची छाननी केली जाईल. तथापि, Amazon ने भारतीय कामगार कायद्यांच्या विद्यमान तरतुदींचे उल्लंघन केले आहे, ज्याचा उद्देश कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे. लागू करण्यात आलेले हे ऐच्छिक पृथक्करण धोरण कधीही कामगार मंत्रालयाकडे पुनरावलोकनासाठी सादर केले गेले नाही, जे विद्यमान कामगार कायद्यांचे उल्लंघन आहे. या तक्रारीच्या आधारे सहाय्यक कामगार आयुक्त जी.एस.शिंदे यांनी अॅमेझॉन मॅनेजरला 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.