Pune Gang : दहशत माजवणाऱ्या गॅंगसमोर पुणेकरही कमी नाहीत; नागरिकांनी दिला गुंडांना बेदम मार

एमपीसी न्यूज : पुण्यात दहशत (Pune Gang) माजवणाऱ्या टोळ्या वाढत चालल्या आहेत. परंतु, पुणेकर आणि पोलिस देखील काही त्यांच्यापेक्षा कमी नाहीत. काही दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या गुंडाना पोलिसांनी भर रस्त्यात चोप दिला होता. तर, आता बांबुचा धाक दाखवणाऱ्या गुंडांना नागरिकांनीच बेदम मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे दहशत दाखवणाऱ्या टोळीला आता नागरिकच प्रतिउत्तर देताना दिसत आहेत.

Hadapsar : पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सात कामगारांचे मोबाईल लंपास

सोमवारी 9 जानेवरी रोजी तुळशीबागेत बांबू घेऊन (Pune Gang) दोघेजण दहशत माजवत होते. स्थानिक दुकानदारांनी त्यांना चांगलाच चोप देऊन त्यांचा माज उतरवला आहे. बांबू घेऊन खंडणी मागणे, सामान्य लोकांना लुटणे असा प्रकार सुरू होता. गर्दीच्या ठिकाण असलेल्या तुळशीबाग आणि तापकीर गल्लीत हा प्रकार सुरू होता. मात्र स्थानिकांनी त्यांना बेदम मारल्याने दोघांपैकी एक जण पळून गेला तर दुसऱ्याला पकडून फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही दोन्ही मुले अल्पवयीन असून पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.