Pune : पत्नीशी असलेल्या वादावर धार्मिक तोडगा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 5 कोटींची फसवणूक

 एमपीसी न्यूज : –  पत्नीशी सुरू असलेल्या वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून कोंढवा भागातील एका डॉक्टरची 5 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत एका 67 वर्षीय डॉक्टरने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डॉक्टर कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहायला आहेत. या प्रकरणी सादिक अब्दुल मजीद शेख, यास्मिन सादिक शेख, एहतेशाम सादिक शेख, अम्मार सादिक शेख, राज आढाव ऊर्फ नरसू यांच्याविरुद्ध फसवणूक, तसेच अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे  डॉक्टर (Kondhwa) असून त्यांनी सौदी अरेबियात 30 वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला आहे. सन 2018 मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर आणि पत्नीत वाद सुरू होता, दरम्यान फिर्यादी हे प्रार्थनास्थळाला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची आरोपींशी (Kondhwa) ओळख झाली. त्यानंतर कौटुंबिक वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. तोडगा केल्यानंतर स्वर्गप्राप्ती होईल, असे आमिष दाखविले होते. फिर्यादी यांच्याकडून तब्बल 5 कोटी 37 लाख घेत त्यांची फसवणूक कऱण्यात आली आहे.

 

Salman Khan : सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचे धागेदोरे कॅनडापर्यंत

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share