Pune : पोलिसांचा ड्रग्स तस्कराच्या घरी छापा अन धडकीने आरोपीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी (Pune) एका सराईत ड्रग्स तस्कराच्या घरी छापा टाकला असता केवळ पोलिसांना बघूनच त्याला हृदयविकाराचा झटका आला अन दवाखान्यात दाखल करताच त्याचा मृत्यू झाला. हा सरा प्रकार पुणे येथील नाना पेठ परिसरात घडला आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या (वय 52) घरी छापा टाकला. पोलिसांचे पथक घरी आल्याचे बघताच तो हृदयविकाराने खाली कोसळला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Pune : पुण्याचे कमाल तापमान 38 अंशावर, उन्हाचा चटका अन घामाच्या धारांनी नागरिक हैराण

गुन्हे (Pune) शाखेच्या पोलिसांनी कोंढवा, हडपसर भागात छापे टाकून पाच नायजेरियनसह सात जणांना नुकतीच अटक केली. स्थानिक पोलिसांकडूनही त्यांच्या हद्दीतील अमली पदार्थ विक्रेत्यांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच, सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.