Loksabha Election : जातीय तेढ निर्माण करण्याचे काम मोदींकडून होत आहे – शरद पवार

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून जातीय तेढ निर्माण करण्याचे तसेच लोकशाही व संविधान संपुष्टात आणण्याचे  काम चालू आहे अशी टीका माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे (शरदचंद्र पवार)अध्यक्ष शरद पवार(Loksabha Election) यांनी पंढरपूर येथून शुक्रवारी (दि.26 एप्रिल) रोजी केली.

 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका चालू आहे. पंतप्रधान मोदी यांची आज (27 एप्रिल) रोजी कोल्हापूर येथे सभा असून शरद पवार यांनी सोलापूर जिल्हयातील माळशिरस आणि पंढरपूर येथे धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काल सभा घेतली आणि सभेतून   पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.पंतप्रधान मोदी सध्या महाराष्ट्रात आणि देशात जातीय तेढ निर्माण होईल असे भाषणं देत आहेत. जवाहरलाल नेहरू,राजीव गांधी ,राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करत असताना(Loksabha Election) पाहायला मिळत आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, प्रत्येक नागरिक आपला आहे अशी दृष्टी ठेवली पाहिजे.पण जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करत ते आपला वेळ घालवीत आहेत असेही ते म्हणाले.

 

LokSabha Elections 2024 : निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

ज्या नेहरूंनी स्वातंत्र्याआधी तुरुंगवास भोगला आणि गांधीच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा माणसावर टीका केली नाही पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण सध्या याचा दुरुपयोग होत असताना दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी सध्या देशात हिंसक भाषणे देतात त्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही  पवार पुढे बोलताना म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.