Baramati : … अखेर मोरगाव वीज उपकेंद्राला महावितरणकडून सुरक्षारक्षक

एमपीसी न्यूज – किरकोळ वीजबिलावरुन एका महिला वीज कर्मचाऱ्याची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना महावितरण बारामती परिमंडलात घडली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी महावितरण प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, मोरगाव शाखा कार्यालयाला तातडीने सुरक्षा रक्षक नेमले आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्याचे आदेशही मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी दिले आहेत.

मोरगावच्या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून असुरक्षेची भावना तयार होत आहे. त्यासाठी संघटना प्रतिनिधींकडून वीज उपकेंद्रांना सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांना मोरगाव उपकेंद्राला तातडीने तीन सुरक्षारक्षक देण्याचे आदेश दिले. तीन पाळीमध्ये प्रत्येकी एक अशी ही सुरक्षा असणार आहे.

 

Morgaon : वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या तरुणाने महिला वीज कर्मचाऱ्याचा केला खून

तसेच मोरगाव शाखा व उपकेंद्राला सीसीटीव्ही बसविण्याचे कामही शनिवारी सकाळी (27 एप्रिल) रोजी सुरू करण्यात आले आहे. याशिवाय परिमंडलातील संवेदनशील उपकेंद्राची माहिती गोळा करण्याचे निर्देश सुद्धा मुख्य अभियंता पावडे यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.