Talegaon Dabhade : तळेगाव मधील 60 केंद्रांवर मतदानाची तयारी

तळेगाव शहरात 59 हजार 346 जण  आहेत मतदार 

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान होणार ( Talegaon Dabhade ) आहे. तळेगाव दाभाडे शहरात 60 मतदान केंद्र आहेत. तळेगावला कोटेश्वरवाडी येथील एक व शेलारवाडी येथील दोन मतदान केंद्र जोडण्यात आली आहे. शहरात 59 हजार 346 जण मतदार आहेत.अशी माहिती तळेगाव दाभाडे मंडल अधिकारी बजरंग मेकाले यांनी दिली.

मावळ लोकसभा क्र.33 मधील 204 मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे महसूल हद्दीत कोटेश्वरवाडी- केंद्र 1 व शेलारवाडी- केंद्र 2 धरून एकूण 63 मतदान केंद्र आहेत. यामध्ये एकूण मतदान  62321 एवढे असून पुरुष मतदार 32264  तर महिला मतदार 30057   असल्याची माहिती तळेगाव दाभाडे मंडल अधिकारी बजरंग मेकाले यांनी दिली.

Talegaon Dabhade : अक्षय तृतीयानिमित्त बनेश्वर मंदिरात चंदनउटी सोहळा

13  मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण होत असल्याचे चित्र दिसत आहे. मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे गाव मोठी मतदार संख्या असलेले गाव म्हणून ओळखले ( Talegaon Dabhade ) जाते. यामध्ये एकूण 60 मतदान केंद्र असून त्यामध्ये अनुक्रमे मतदान केंद्र शाळेचे ईमारतीचे नाव, ईमारती मध्ये असलेली मतदान केंद्र संख्या,एकूण मतदार पुढील प्रमाणे –

1) सरस्वती विद्या मंदिर शाळा तपोधाम कॉलनी वराळे रोड, केंद्र 6 संख्या, 5696 मतदार.

2) इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव चाकण रोड, केंद्र 8 संख्या, 7211  मतदार.

3) संत ज्ञानेश्वर प्रा.शाळा (गुलाबी शाळा), केंद्र 9 संख्या, 8931  मतदार.

4) नवीन समर्थ विद्यालय (नूतन), केंद्र 3  संख्या, 4043  मतदार

5) लोकमान्य टिळक प्रा. शाळा क्र.6 (गवत बाजार जवळ), केंद्र 7  संख्या, 6440 मतदार

6) वीर जिजामाता कन्या शाळा क्र. 5 , केंद्र ८संख्या, 7559 मतदार.

7 ) थोर समाज सेवक नथुभाऊ भेगडे शाळा क्र. 1, केंद्र 10 संख्या 10483 मतदार.

8) सुभाष चौक जुनी भाजी मंडई, केंद्र 4 संख्या, 4207 मतदार.

9 ) गणेश मोफत वाचनालय शाळा चौक, केंद्र 2 संख्या, 2033 मतदार.

10 ) चावडी चौक (तलाठी कार्यालय), केंद्र 2 संख्या, 1402 मतदार.

11) कैकाडी समाज मंदिर (भेगडे आळी),केंद्र1 संख्या, 1341 मतदार. (फक्त तळेगाव दाभाडे हद्दीत एकूण मतदान केंद्र – 60, मतदार संख्या – 59346 अशी आहे.)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.