Pune : दुचाकीची लाईट डोळ्यावर चमकावल्याने टोळक्याकडून दोघांना मारहाण

 एमपीसी न्यूज – गाडीची लाईट चमकावल्याच्या किरकोळ कारणावरुन 20 जणांनी मिळून ( Pune)  दोघांना मारहाण केल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये मारहाणीची घटना घडली आहे . या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

महमंदवाडी येथे दोन तरुण कॉफी पिण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दुचाकीची लाईट समोर असलेल्या तरुणांच्या डोळ्यावर चमकावली. यातून दोन्ही गटात वादावादी सुरू झाली.

Talegaon Dabhade : तळेगाव मधील 60 केंद्रांवर मतदानाची तयारी

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्याच ठिकाणी असलेल्या रस्त्यावर एका गटाने समोरच्या तरुणाला त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या घटनेमुळे काही वेळासाठी या परिसरात भीतीचे वातावरण होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून कोंढवा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत ( Pune)  आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.