MPSC Exam : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलै  रोजी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा   6 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आली ( MPSC Exam) आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.

या परिक्षेसाठी 29 डिसेंबर 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली आहे.

या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या ( MPSC Exam) विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. याबाबत सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार आयोगाच्या ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

Pune : दुचाकीची लाईट डोळ्यावर चमकावल्याने टोळक्याकडून दोघांना मारहाण

 

ही परीक्षा आता 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

 

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे, 2024 रोजी पर्यंत आहे.

 

भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत 26 मे 2024 पर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 27 मे, 2024 रोजी आहे.

 

अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 परीक्षेकरीता अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करता येईल –

 

संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील  “माय अकाऊॅट” सदराखाली परीक्षेच्या जाहिरातीकरीता उपलब्घ करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शविण्यात आलेल्या “क्वेशन” या बटनावर क्लिक करून ( MPSC Exam) विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील.

 

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्‌धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरतीप्रकिये दरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.

 

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरीता अनुज्ञेय ( MPSC Exam) असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील माय आकऊँट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक च्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील.

 

संबंधित परीक्षेकरीता अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मधील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब संवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच 25 जानेवारी, 2024 अशी होती.

 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा ( MPSC Exam) दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्या साठी विहित अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे.

 

या परीक्षेकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन 2023-2024 अथवा 2024-2025 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे(NCL) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

 

या परीक्षेच्या मूळ जाहिरातीमधील एकूण 16 संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पात्रतेनुसार विकल्प घेण्यात आले. आता शुद्धीपत्रकामध्ये नवीन 6 संवर्गाचा समावेश होत असल्याने मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची व तसेच शुद्धीपत्रकानुसार नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची एकूण 22 संवर्गासाठी पात्रता (वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, दिव्यांग सुनिश्चिती इत्यादी बाबी ) मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्याच्या टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येईल.

 ( MPSC Exam)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.