Mumbai : 20 वर्षांपासून फरार असलेला मोस्ट वाँटेड गँगस्टर प्रसाद पुजारी चीनमधून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी

एमपीसी न्यूज : 20 वर्षांपूर्वी भारतातून फरार (Mumbai) झालेला मोस्ट वाँटेड गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबईत आणण्यात आले आहे. तो 20 वर्षांपासून फरार होता. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. पहिल्यांदाच चीनमधून एका गुन्हेगाराला भारतात पाठवण्यात येत आहे. 

टॉप इंटेलिजन्स एजन्सीने पुष्टी केली आहे की 20 वर्षांपासून फरार असलेला गुंड प्रसाद पुजारी याला चीनमधून हद्दपार करण्यात आले आहे. प्रसाद पुजारी मुंबई पोलिसांना पाहिजे आहे. प्रसाद पुजारीवर मुंबईत खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने प्रसाद पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या विरुद्ध शेवटचा गुन्हा 2020 मध्ये मुंबईत दाखल झाला होता.

Pune : पोलिसांचा ड्रग्स तस्कराच्या घरी छापा अन धडकीने आरोपीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रसाद पुजारी भारतातून पळून चीनमध्ये पोहोचला होता. भारतीय एजन्सींच्या तावडीतून सुटण्यासाठी पुजाऱ्याने एका चिनी महिलेशी लग्न केले होते, मात्र तपास यंत्रणांनी कठोर परिश्रम केल्यानंतर आता त्याला चीनमधून भारतात (Mumbai) पाठवले जात आहे. पुजारी आज रात्री मुंबई विमानतळावर पोहचणार असून तेथून मुंबई पोलीस त्याला अटक करणार आहेत. काही वर्षांपूर्वी प्रसाद पुजारी याने शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.