Dehugaon : जगद्गुरु श्री संत तुकोबांचा पालखी सोहळा 28 जूनला

एमपीसी न्यूज –  श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा जूनमध्ये होत असून जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या 339 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तारखा जाहीर करण्यात आली आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने वारीबाबत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ज्येष्ठ कृष्ण सप्तमी म्हणजेच शुक्रवार दि. 28 जून 2024 रोजी दुपारी 2 वाजता जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 339 वा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान(Dehugaon) ठेवणार आहे.

जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 339 वा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थानासंबंधी आज(दि.25) रोजी बैठक झाली. त्यात जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 339 वा आषाढी वारी पालखी सोहळा येत्या 28 जूनला दुपारी 2 वाजता प्रस्थान ठेवणार असून या आषाढी पायी वारीसाठी संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात पालखी सोहळा प्रमुख म्हणून हभप विशाल केशव हभप माणिक गोविंद मोरे, हभप संतोष नारायण मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या वेळी संस्थानचे विश्वस्त हभप संजय महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, हभप भानुदास महाराज मोरे उपस्थित होते.

Pune: मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे – सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज

28 जूनला प्रस्थान आणि पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात, 29 जूनला पालखी सोहळा आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. 30 जूनला पालखी पुण्यात दाखल हाेणार असून दाेन दिवस नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे. 2 जुलैला पालखी सोहळा लाेणी काळभाेरला, 3 जुलैला यवत पालखी तळ, 4 जुलैला वरवंड विठ्ठल मंदिर, 5 जुलैला उडंवडी गवळ्याची पालखी तळ, 6 जुलैला बारामती शारदा विद्यालय, 7 जुलैला सणसर पालखी तळ, 8 जुलैला आंथुर्णेत मुक्कामी असून बेलवाडीत दुपारी गाेल रिंगण(Dehugaon) हाेणार आहे.

9 जुलैला निमगाव केतकी पालखी तळ, 10 जुलैला इंदापूर पालखी तळावर मुक्काम असून दुपारी गाेल रिंगण हाेणार आहे. 11 जुलैला सराटी पालखी तळ, 12 जुलैला अकलूज माने विद्यालय पालखी तळावर मुक्कामी असून दुपारी गाेल रिंगण हाेणार आहे. 13 जुलैला बाेरगाव पालखी मुक्कामी असून दुपारी माळीनगर उभे रिंगण हाेणार आहे. 14 जुलैला पिराची कुराेली गायरान, 15 जुलैला वाखारीला उभे रिंगण हाेणार आहे. 16 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर संत तुकाराम महाराज नवीन इमारत येथे पालखी साेहळा पाेहचणार असून याठिकाणी उभे रिंगण हाेणार आहे. 17 जुलैला आषाढीवारी साेहळा आहे. 21 जुलैला पालखी साेहळ्याचा परतीचा प्रवास सुरू हाेणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.