Dehugaon:  “तुकाराम बीज” निमित्त देहूगाव साठी पीएमपीएमएलचे जादा बसेसचे नियोजन 

एमपीसी न्यूज –    “तुकाराम बीज” निमित्त 27 मार्च रोजी  पीएमपीएमएल तर्फे (Dehugaon) जादा बसेस चे नियोजन केले आहे. यावेळी  जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे दर्शनासाठी देहूगाव येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.
तुकाराम बीज निमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच उपनगरातून देहूगाव येथे (Dehugaon)जाणाऱ्या भाविकांच्या व प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही नेहमीच्या तिकीट दरात हे नियोजन करण्यात आले आहे.

Khed: लग्नाला नकार दिला म्हणून दोघांना बेदम मारहाण 

देहूगाव व आळंदी साठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेल्या स्थानकांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

बस मार्गाचे नाव

स्थानकाचे नाव

1

स्वारगेट ते देहूगाव

स्वारगेट व देहूगाव स्थानक

2

मनपा भवन ते देहूगाव

मनपा भवन व देहूगाव स्थानक

3

मनपा भवन ते आळंदी

मनपा भवन व आळंदी स्थानक

4

देहूगाव ते आळंदी

देहूगाव व आळंदी स्थानक

5

स्वारगेट ते आळंदी

स्वारगेट व आळंदी स्थानक

पुणे स्टेशन ते देहूगाव

पुणे स्टेशन डेपो व देहूगाव स्थानक

निगडी ते देहूगाव

निगडी व देहूगाव स्थानक

हडपसर ते आळंदी

हडपसर व आळंदी

तसेच देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात असून सदर ठिकाणाहून वरील जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

Khed: लग्नाला नकार दिला म्हणून दोघांना बेदम मारहाण 

तसेच देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरीता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रिडांगणा जवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील.
उपरोक्त प्रमाणे जादा बसेसची व्यवस्था दि. 26 ते दि. 28 मार्च अखेर करण्यात आलेली आहे. तरी वरील बससेवेचा लाभ सर्व भाविक-भक्तांनी व प्रवाशी नागरिकांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.